Skip to main content

🌿 अनुकरण की आत्मभान?

🌿 अनुकरण की आत्मभान? 
* ही लेखणी उपदेशासाठी नाही, तर ही लेखणी मनावर कोरलेली एक घटना जी सांगण्यासाठी आहे. आपण अनेकदा पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो, त्यांना श्रेष्ठ मानतो…पण खरंच त्याची गरज आहे का?
👉 पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी घ्या, त्यांची योग्य कर्म बघा. 
पण अंधानुकरण करू नका इतकंच सांगायचं आहे.
▫️ *एक निरीक्षण* 
एक भारतीय अभिनेत्री — श्रीलीला 
• अमेरिकेत जन्म
• अवघ्या ५–६ वर्षांपासून भारतभूमीशी जोडलेली
• थिएटर, संस्कृती, परंपरा अनुभवलेली
पण आज ती —
👉 देवालयात देवाला शोभेल असा पोशाख परिधान करते
👉 मंदिरात सजग, मर्यादित आणि सन्मानाने वावरते
फोटो, व्हिडिओ उपलब्ध आहेत कोणीही पाहू शकता.
या मागे कदाचित एकच कारण असावं असं मला वाटतं. 
👉 ‘देवच सर्व देतो’ पैसा, प्रसिद्धी, संधी, ओळख हे सगळं कर्मातून येतं, अशी तिची धारणा असावी.
🙏 खरी श्रद्धा कशी ओळखावी?

श्रीलीला ही व्यक्ती 
• ६–७ देवळांमध्ये नियमित दर्शन घेते
• VIP लाईन टाळून सामान्य रांगेत उभी राहते
• मीडिया असो वा नसो तिचं वर्तन बदलत नाही. 
👉 यामधून आलेली श्रद्धा, हा दिखावा नाही.
▫️*विज्ञान हेच सांगते की* 
• जेव्हा माणूस स्वतःच्या मुळाशी जोडलेला असतो
• तेव्हा त्याची ओळख (identity) स्थिर राहते
• मेंदूवर ताण कमी पडतो
• निर्णय स्पष्ट होतात
👉 म्हणूनच, आपण कुठे आहोत, कोणासमोर आहोत, याचं भान असणं महत्त्वाचं.

▫️*अध्यात्म काय सांगते?*
अध्यात्म सांगते — 
• देव देतो आपल्या कर्मानुसार. 
• धर्म म्हणजे केवळ पूजा नाही, तर म्हणजे वर्तन. 
• आपली भूमी, आपली संस्कृती, आपले ऊर्जा-स्रोत ओळखून जगणं. 
म्हणूनच — 
👉 आपला पोशाख,
👉 आपलं अन्न,
👉 आपलं वागणं
हे सगळं परिस्थितीनुसार आणि जागेनुसार असायला हवं.
▫️*काम आणि खरं स्वरूप* 
हो, चित्रपटात भूमिका वेगवेगळ्या असू शकतात. तिथे रूप बदलतं, कारण तिथे कामाचा मोबदला मिळतो.
पण — 
👉 देवासमोर,
👉 निसर्गासमोर,
👉 स्वतःच्या अंतरात्म्यासमोर
खरं रूपच उभं राहतं.
▫️*मर्यादा आणि व्यवहार*
मर्यादा पुरुषोत्तम असणं — हाच धर्म.
कोणी योग्य मोबदला देत असेल, तर त्या कालावधीत मर्यादा शिथिल होऊ शकतात. 
👉 तो व्यवहार आहे, धर्म नाही.
 ▫️*महत्त्वाची स्पष्टता* 
मी कोणत्याही व्यक्तीचं समर्थन करत नाही.
मी पोशाखाच्या विरोधातही नाही.
पण — 
👉 आपण विनाकारण पाश्चात्य कपडे
🌱 *तात्पर्य* 
• अनुकरण करा, पण विवेकाने. 
• आधुनिक व्हा, पण मुळं विसरू नका. 
• जगाशी जुळवा, पण स्वत्व गमावू नका. 
🌟 *देव बदलत नाही आपण बदलतो म्हणून वागणं बदललं, तर आयुष्यही बदलतं.*

🌿 Imitation or Self-Awareness?

This writing is not meant to preach; it is simply sharing an incident that left an impression on my mind. We often imitate Western culture and consider it superior… but is that really necessary?

👉 Learn the good things from the West and observe their positive actions.
But do not blindly imitate them—that is the only point being made.

▫️ An Observation

An Indian actress — Sreeleela

• Born in the United States
• Connected with the land of India since the age of about 5–6
• Has experienced theatre, culture, and traditions

Yet today she —
👉 Wears attire in temples that is appropriate and respectful for the deity
👉 Behaves in temples with awareness, dignity, and respect

Photos and videos are available; anyone can see them.

There may be one simple reason behind this, I believe.
👉 She may believe that God gives everything — money, fame, opportunities, and recognition all come through one’s actions (karma).

🙏 How do we recognize true devotion?

Sreeleela as a person:
• Regularly visits 6–7 temples for darshan
• Avoids VIP lines and stands in the regular queue
• Her behavior does not change whether the media is present or not

👉 The devotion shown through this does not appear to be mere display.

▫️ Science also says

• When a person stays connected to their roots
• Their identity remains stable
• The brain experiences less stress
• Decisions become clearer

👉 That is why being aware of where we are and in whose presence we are is important.

▫️ What does spirituality say?

Spirituality says —
• God gives according to our actions (karma).
• Dharma is not just worship; it is behavior.
• Living with awareness of our land, culture, and sources of energy.

Therefore —
👉 Our clothing
👉 Our food
👉 Our behavior

should all be appropriate to the place and situation.

▫️ Work and One’s True Self

Yes, in films the roles may be different. Appearances change there because it is part of the work for which one is paid.

But —
👉 In front of God
👉 In front of nature
👉 In front of one’s own conscience

our true self stands revealed.

▫️ Limits and Practical Life

Being a person of discipline and boundaries is dharma.

If someone pays proper compensation for work, then for that period certain limits may be relaxed.

👉 That is professional conduct, not religion.

▫️ An Important Clarification

I am not supporting any particular person.
Nor am I opposing any kind of clothing.

But —
👉 We should not adopt Western clothing without reason.

🌱 Conclusion

• Imitate, but with wisdom.
• Be modern, but do not forget your roots.
• Adapt to the world, but do not lose your identity.

🌟 God does not change—but when we change our behavior, life changes as well.